दैनिक राशीभविष्य, Daily Horoscope 4 September 2025: पंचांगानुसार, गुरुवार, 4 सप्टेंबर 2025 रोजी भाद्रपद शुक्ल द्वादशी तिथी. या दिवशी परिवर्तिनी एकादशी समाप्त होत द्वादशी प्रारंभ होत आहे. यासह उत्तराषाढा नक्षत्र आणि सौभाग्य योगाचा संयोग जुळून येत आहे. गुरुवारी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 51 मिनिटे ते 12 वाजून 41 मिनिटांपर्यंत असेल. तर राहुकाल दुपारी 1 वाजून 50 मिनिटे ते 3 वाजून 23 मिनिटांपर्यंत असेल. तर चंद्र मकर राशीत भ्रमण करेल. त्यानुसार, जाणून घेऊया मेष ते मीन या बारा राशींसाठी कसा असेल गुरुवार, 4 सप्टेंबर 2025 रोजीचा दिवस.
मेष आजचे राशी भविष्य ( Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. व्यावसायिकांना व्यवसायात यश हवे असेल तर याशाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी परिश्रम करावे लागेल. नोकरदार वर्गाला पदोन्नतीमध्ये यश मिळेल. तरुणांचे प्रेम जीवनात आनंदी राहील. विद्यार्थी आज उत्साही राहतील. कौटुंबिक वातावरण समाधानी राहील.
शुभ रंग – पांढरा आणि पिवळा,
शुभ अंक – 2 आणि 9.
उपाय – गणपतीची पूजा आणि तीळ दान करा.
वृषभ आजचे राशी भविष्य (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील. नोकरदार वर्गाने आज रागावर नियंत्रण ठेवावे. कारण, नोकरीच्या ठिकाणी वाद होऊ शकतो. वादात न पडता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस व्यस्त स्वरुपाचा आहे. तुम्ही एखादा विशेष प्रकल्प यशस्वी करण्यात गुंतलेले राहाल.
शुभ रंग – हिरवा आणि निळा.
शुभ अंक – 8 आणि 5.
उपाय – 9 वेळा सप्तश्लोकी दुर्गेचे पठण करा.
मिथुन आजचे राशी भविष्य (Gemini Horoscope Today)
आजचा दिवस विशेष लाभ मिळवून देणारा राहील. त्यानुसार, तुम्हाला व्यवसायात अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. करिअरची चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. ही संधी सोडू नका. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास आजचा दिवस योग्य आहे. व्यवसायातील अडकलेला पैसा परत मिळेल. प्रेम जीवनात वाद संभवतो.
शुभ रंग – लाल आणि हिरवा.
शुभ अंक – 2 आणि 9.
उपाय – श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करा.
कर्क आजचे राशी भविष्य (Cancer Horoscope Today)
धार्मिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही मित्रांसोबत धार्मिकस्थळी भेट देऊ शकता. व्यवसायात प्रयत्न करूनही यश मिळणार नाही. पण, रिअल ईस्टेट किंवा शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून भविष्यात चांगले परतावे मिळतील. प्रेम जीवनात तणाव राहील.
शुभ रंग – केशरी आणि पिवळा.
शुभ अंक – 4 आणि 9.
उपाय – सात धान्य किंवा फळांचे दान करा, सुंदरकांडाचे पठण करा.
सिंह आजचे राशी भविष्य (Leo Horoscope Today)
सातव्या भावातील चंद्र, सूर्य आणि गुरु सकारात्मक आहे. धार्मिक कार्यात यश मिळेल. व्यवसायात यशासाठी प्रयत्नशिल राहाल. विद्यार्थ्यांनी यशासाठी अधीक प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी उर्जेचा योग्य वापर करावा. मन एकाग्र करण्यासाठी योग आणि ध्यान करा. प्रेम जीवन सामान्य राहील.
शुभ रंग – केशरी आणि लाल.
शुभ अंक – 8 आणि 5.
उपाय – हनुमानाची पूजा करा आणि तीळ दान करा.
कन्या आजचे राशी भविष्य (Virgo Horoscope Today)
नोकरी-व्यवसायासाठी दिवस अनुकूल आहे. व्यवसाय वाढीस मदत होईल. नोकरीत पदोन्नतीसाठी प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या बोलण्याने इतरांचे मन जिंकता. ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या यशात महत्त्वाची ठरेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
शुभ रंग – निळा आणि हिरवा.
शुभ अंक – 4 आणि 8.
उपाय- तीळ आणि तांदूळ दान करा.
तूळ आजचे राशी भविष्य (Libra Horoscope Today)
नोकरी आणि व्यवसायात शुक्र आणि मंगळच्या कृपेने यश मिळेल. व्यवसायात नवीन प्रकल्प यशस्वी होत तुम्हाला लाभ होईल. प्रेम जीवन चांगले राहत पार्टनर सोबत रोमँटिक सहलीला गेल्याने मन उत्साह आणि तणावापासून मुक्त राहील. व्यवसायातील यशामुळे आनंदी राहाल.
शुभ रंग – आकाशी आणि हिरवा.
शुभ अंक – 4 आणि 8.
उपाय – तीळ दान करा. तसेच श्रीहरी विष्णूला तुळशी आणि मिठाई अर्पण करा.
वृश्चिक आजचे राशी भविष्य (Scorpio Horoscope Today)
आकरावा मंगळ शुभ परिणाम देणारा ठरेल. नोकरी-व्यवसायात सामान्य स्थिती राहील. रिअल ईस्टेटमध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल. आध्यात्मिक प्रगती होईल. प्रेम जीवनातील समस्या दूर होत मन प्रसन्न राहील. मोठ्या भावाकडून लाभ होऊ शकतो.
शुभ रंग – पिवळा आणि निळा.
शुभ अंक – 7 आणि 4.
उपाय – महादेवाची पूजा करा आणि तीळ दान करा.
धनु आजचे राशी भविष्य (Sagittarius Horoscope Today)
नोकरीत संघर्षाची स्थिती राहील. व्यवसायासाठी दिवस सकारात्मक आहे. व्यवसातील प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. लव्ह लाईफमध्ये उत्साह आणि आनंद राहील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ रंग – केशरी आणि पिवळा.
शुभ अंक – 9 आणि 3.
उपाय – मसूर डाळ दान करा.
मकर आजचे राशी भविष्य (Capricorn Horoscope Today)
व्यवसायासाठी आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसायात पुर्वीपेक्षा चांगली स्थिती राहील. करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आत्मविश्वास दृढ होईल. सकारात्मक विचारामुळे जीवनाला योग्य दिशा मिळेल. लव्ह लाईफ चांगली राहील.
शुभ रंग – लाल आणि निळा.
शुभ अंक – 2 आणि 6.
उपाय – महादेवाची पूजा करा. तीळ आणि उडीद दान करा.
कुंभ राशी भविष्य (Aquarius Horoscope Today)
आज चंद्र खर्चाच्या घरात आहे. व्यवसायाच्या ताणतणाव जाणवेल. नोकरीत योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा. नकारात्मक विचारामुळे विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होई शकतात. आज व्यवसायात बराच काळापासून अडकलेले पैसा परत मिळेल.
शुभ रंग – हिरवा आणि पांढरा.
शुभ अंक – 2 आणि 9.
उपाय – श्रीहरी विष्णूची पूजा करा. तांदूळ आणि गूळाचे दान करा.
मीन आजचे राशी भविष्य (Pisces Horoscope Today)
चंद्र व्यवसायासाठी अनुकूल आहे. तुम्ही उत्साही राहाल. व्यवसायात योग्य दिशेने काम कराल. मित्राचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थी करिअरमध्ये यशस्वी होतील. लव्ह लाईफ रोमँटिक राहील.
शुभ रंग – पिवळा आणि लाल.
शुभ अंक – 2 आणि 3.
उपाय – श्री आदित्यहृदय स्तोत्राचे 3 वेळा पठण करा.