Shreyas Iyer: येत्या सप्टेंबर महिन्यापासून आशिया कप 2025 सुरु होत आहे. या चषकासाठी म्हणजेच आशिया कप 2025 साठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. या संदर्भात निवड समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला. मात्र, संघात श्रेयस अय्यरचा न घेता निवड समितीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. श्रेयस अय्यरला आशिया चषकाच्या संघात संधी न दिल्यामुळे सध्या चांगलीच चर्चा रंगली असताना एक नवीन माहिती समोर आली आहे.
या बाबत दै. जागरणमध्ये एक वृत्त प्रकाशित झाले आहे. या वृत्तानुसार, बीसीसीआय श्रेयस अय्यरला वनडे संघाचा कर्णधार बनवण्याचा विचार करत आहे. श्रेयस अय्यरला 2027 च्या विश्वचषकापर्यंत एक दिवशीय क्रिकेट संघाचं कर्णधार पद मिळू शकतं. सध्या रोहित शर्माकडे भारताच्या वनडे संघाचं नेतृत्व आहे. मात्र, तो 2027 च्या विश्वचषकापर्यंत खेळू शकतो का? या बाबात भविष्य अद्याप निश्चित नाही.
आशिया चषकासाठी टीन इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव.
असा असेल भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग (सर्व फलंदाज).
संजू सॅमसन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक).
हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल ( सर्व अष्टपैलू).
जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा (सर्व गोलंदाज).
आशिया कपमधील भारताचे वेळापत्रक
10 सप्टेंबर – विरुद्ध यूएई (दुबई)
14 सप्टेंबर – विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
19 सप्टेंबर – विरुद्ध ओमान (अबू धाबी)