Satara Crime News : कौटुंबिक वादातून एका गरोदर मातेने दोन मुलीसह विहिरीत उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील परळी खोऱ्यातील कारी येथील ही धक्कादायक घटना असून या घटनेत मातेसह एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने एका मुलीचा जीव वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे. आत्महत्येच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा विशाल मोरे (वय 27 वर्ष) असे मयत गर्भवती महिलेचे नाव असून तिला त्रिषा (वय 6 वर्ष) आणि स्पृहा (वय 3 वर्ष) या दोन मुली आहे. मयत महिलेचे पती हे मुंबईत काम करत असून त्यामुळे ऋतुजा या पती आणि मुलींसह मुंबईत राहत होत्या. गणपतीनिमित्त मोरे कुटुंबिय साताऱ्याच्या परळी खोऱ्यातील कारी येथील गावी आले होते. गणपती उत्सवानिमित्त ते मुंबई परत जाणार होते. दरम्यान, कौटुंबिक वाद झाल्याने गरोधर माता ऋतुजा हिने तिच्या दोन मुलींसह घराशेजारीत विहिरीत स्वतःला झोकून दिले. धक्कादायक अशा या घटनेत ऋतुजा विशाल मोरे (वय 27 वर्ष), स्पृहा (वय 3 वर्ष) आणि गर्भातील अभ्रकाचा मृत्यू झाला आहे. तर त्रिशा (वय 6 वर्ष) या तिच्या मोठ्या मुलीला वाचवण्यात यश आले. कारी येथील मूळ रहिवासी असलेले हे कुटुंब उद्योगधंद्यानिमित्त मुंबई येथे असतात. ते गणपती उत्सवानिमित्त ते आपल्या मूळ गावी कारी येथे आले होते.
झाडाच्या फांदीमुळे वाचला एकीचा जीव
गणपती उत्सवनिमित्त गावी आलेल्या मोरे कुटुंबात कौटुंबिक कारणामुळे वाद झाला. हा वाद विकोप्याला जात ऋतुजा यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी घराजवळ असलेल्या एका विहिरीत मुलगी स्पृहा, त्रिषा यांच्यासह उडी मारली. मात्र, सुदैवाने मोठी मुलगा त्रिषा ही झाडाच्या फांदीला लटकली आणि ती ओरडू लागली. या तिघ मायलेकींनी विहिरीत उडी मारती तेव्हा गावातील युवक जवळच हराळी ( द्रुवा) काढत होते. त्रिषाचा ओरडण्याचा आवाज ऐकून युवकांनी धाव घेतली. युवकांच्या निदर्शनास त्रिषा विहिरीत पडल्याचे दिसले. ती विहिरीतील एका झाडाच्या फांदी लटकलेली होती. हा बाब लक्षात घेता युवकांनी तत्काळ मदतकार्य करत तिला वाचवले. मात्र ऋतु आणि स्पृहा यांचा तोपर्यंत करुन अंत झाला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस स्टेसनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.