Political News: विदर्भात शिवसेना ठाकरे गटाला धक्का! खासदार प्रतिभा धानोरकरांचा दीर भाजपात

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

Political News: राज्याला सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचालिंनी वेग आला आहे. अशात भारतीय जनता पक्षात इनकमिंग वाढली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हण यांच्या उपस्थितीत भाजपात जोरदार पक्षप्रवेश होत आहेत. अशात आता महाविकास आघाडीला धक्का देण्याचं काम भाजपाने केलं आहे. भाजपाने आता काँग्रेस खासदाराच्या दीरालाच गळाला लावत त्यांचा भाजपात प्रवेश करुन घेतला आहे. विदर्भात महाविकास अघाडीला हा धक्का बसला असून चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha dhanorkar) यांचे दीर अनिल धानोरकर यानी शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिरांच्या उपस्थितीत अनिल धानोरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपात प्रवेश केला.

अनिल धानोरकर हे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे बंधू आहेत. तर चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे ते दीर आहेत. मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनिल धानोरकर यांनी भाजपात प्रवेश करत भाजपाचा झेंडा हाती घेतला. यावेळी, शिवसेना (उबोठा) च्या 10 नगरसेवकांनी देखील भाजपात प्रवेश केला. अनिल धानोकर यांनी यापूर्वी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्षात काम केले आहे.

यासह अनिल धानोरकर भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष देखील होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात धानोरकर कुटुंबीयांची भद्रावती नगरपरिषदेवर एकहाती सत्ता आहे. यासह त्यांच्याकडे शिवसेना ठाकरे गट जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देखील होती. विधानसभा निवडणुकीत अनिल धानोरकर यांना वरोरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसने तिकीट नाकारले होते. तेव्हा पासून त्याची महाविकास अघाडी बद्दल नाराजी होती. तर वंचित बहूजन आघाडीच्या तिकीटावर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात आता त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे विदर्भात शिवसेनेला (उबोठा) मोठा धक्का बसला आहे. तर भाजपाला त्यांच्या प्रवेशामुळे संघटन वाढीला मदत मिळणार आहे.

Editor  
Editor लेखक हे गेल्या १५ वर्षांसापून मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव असून पत्रकारीतेतील या पंधरा वर्षांच्या प्रवासात त्यांनी दै. गावकरी, दै. तरुण भारत,दै. पुण्यनगरी, झी मीडिया, टाईम्स मीडिया गृपमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. राजकारण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, क्रीडा, हायपर लोकल, शिक्षण, सामाजिक, व्यापार-उद्योग, आरोग्य, धार्मिक, मनोरंजन आदी विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. स्वातंत्र्य लेखनशैली, अभ्यासपूर्ण दर्जेदार लेखनात ते सातत्य ठेवून आहेत. Read More
For Feedback - evyaspith909@Gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon