Pitru Paksha 2025 Date: यंदा काधीपासून सुरु होतोय पितृपक्ष? जाणून घ्या तिथी, श्राद्ध पूजा आणि बरेच काही

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

Pitru Paksha 2025 Date: श्रावण मास संपला असून आता भाद्रपद मास प्रारंभ झाला आहे. भाद्रपद मासात गणेशोत्सवासह महत्त्वाच्या तिथी येतात. हा महिना पितर आणि पूर्वजांना देखील समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात पितृपक्ष देखील साजरा केला जातो. हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, व्यक्तीच्या जीवनावर पितरांचा खूप प्रभाव असतो. पितर व्यक्तीच्या सुखः आणि दुःखाचे कारण ठरु शकतात. पितरांची म्हणजेच पूर्वजांची कृपा असेल तर व्यक्तीला जीवनात सुख-शांती प्राप्त होत. तर पितरांची अवकृपा झाली व्यक्तीचे जीवन समस्यांनी भरलेले राहते. त्यामुळे पितरांना तृप्त किंवा शांत करण्याचा सल्ला पुराणात दिला आहे. पितरांच्या शांती करीता पितृपक्ष समर्पित आहे. या काळात पितर आणि पूर्वजांच्या शांतीसाठी श्राद्ध आणि पिंडदान असे धार्मिक विधी केले जातात. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून पितृपक्ष प्रारंभ होतो. तर अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्षाची समाप्ती होते. चला जाणून घेऊ यंदा पितृपक्ष कधी सुरू होईल आणि कोणत्या तिथीला कोणते श्राद्ध केले जाईल.

या तिथीपासून सुरु होतोय पितृपक्ष

पंचांगानुसार, दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून प्रारंभ होतो. तर अश्विन महिन्याच्या अमावास्येला पितृपक्षाची समाप्ती होते. त्यानुसार, यंदा 7 सप्टेंबर 2025 पासून पितृपक्ष प्रारंभ होत आहे. तर 21 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्येला पितृपक्ष समाप्त होईल.

पितृपक्ष तिथी आणि वार

पौर्णिमा श्राद्ध- रविवार, 07 सप्टेंबर 2025
प्रतिपदा श्राद्ध- सोमवार, 08 सप्टेंबर 2025
द्वितीया श्राद्ध- मंगळवार, 09 सप्टेंबर 2025
तृतीया श्राद्ध- बुधवार, 10 सप्टेंबर 2025
चतुर्थी श्राद्ध- बुधवार, 10 सप्टेंबर 2025
पंचमी श्राद्ध- गुरुवार, 11 सप्टेंबर 2025
महाभरणी- गुरुवार, 11 सप्टेंबर 2025
षष्ठी श्राद्ध- शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025
सप्तमी श्राद्ध- शनिवार, 13 सप्टेंबर 2025
अष्टमी श्राद्ध- रविवार, 14 सप्टेंबर 2025
नवमी श्राद्ध- सोमवार, 15 सप्टेंबर 2025
दशमी श्राद्ध- मंगळवार, 16 सप्टेंबर 2025
एकादशी श्राद्ध- बुधवार, 17 सप्टेंबर 2025
द्वादशी श्राद्ध- गुरुवार, 18 सप्टेंबर 2025
त्रयोदशी श्राद्ध- शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025
माघ श्राद्ध – शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025
चतुर्दशी श्राद्ध- शनिवार, 20 सप्टेंबर 2025
सर्वपित्री अमावस्या- रविवार, 21 सप्टेंबर 2025

(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. Times Now Marathi या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)​​

Editor  
Editor लेखक हे गेल्या १५ वर्षांसापून मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव असून पत्रकारीतेतील या पंधरा वर्षांच्या प्रवासात त्यांनी दै. गावकरी, दै. तरुण भारत,दै. पुण्यनगरी, झी मीडिया, टाईम्स मीडिया गृपमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. राजकारण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, क्रीडा, हायपर लोकल, शिक्षण, सामाजिक, व्यापार-उद्योग, आरोग्य, धार्मिक, मनोरंजन आदी विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. स्वातंत्र्य लेखनशैली, अभ्यासपूर्ण दर्जेदार लेखनात ते सातत्य ठेवून आहेत. Read More
For Feedback - evyaspith909@Gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon