Murder In Bhusawal: सोबत दारु प्यायले अन् केला घात, खुनाच्या घटनेने भुसावळ पुन्हा हादरले

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

Bhusawal Murder News: गुन्हेगारीच्या बाबतीत कायम चर्चेत राहणाऱ्या भुसावळातून एक खळबळजणक बातमी समोर आली आहे. खुनाची ही बातमी असून या हत्याकांडाने भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले आहे. भुसावळात कामानिमित्त आलेल्या चौघ मित्रांमध्ये वाद होत हा प्रकार घडला. वादापूर्वी चौघे मित्र सोबत दारु प्यायले अन् नंतर तरूणाचा खून करण्यात आला. भुसावळ शहरातील कंडारी शिवारात हा हत्याकांड घडला असून मयत आणि मारेकरी सर्व जळगावातील रहीवासी असल्याचे समोर आले आहे.

शहराला हादरवून सोडणारा हा प्रकार रविवार 5 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास समोर आला आहे. या हत्याकांडातील मयताचे नाव जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय 40) असून तो जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहीवासी होता. चौघा मित्रांमधील किरकोळ वादाचा तो बळी ठरला आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी जळगाव येथील असून त्यात एक माजी महापौराचा मुलगा असल्याचे प्रथमिक तपासत समोर आले आहे. त्या दृष्टीने पोलिसांचं पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना झाले आहे.

हॉटेलमध्ये मद्यपान अन्…

मयत तरुण जितेंद्र साळुंखे हा जळगावातील तीन जणांसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी शिवारात कामानिमित्त आला होता. दरम्यान, या परिसरातील एका हॉटेलमध्ये चौघांनी मद्यपान केले. मद्यपानदरम्यान चौघांमध्ये वाद होत वादचे रुपांतर हाणामारीत झाले. हा वाद विकोप्याला जात जितेंद्रच्या सोबतच्या तिघांनी जितेंद्रवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात जितेंद्र हा रक्ताच्या थेरोळ्यात खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत जितेंद्रला तात्काळ खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

घटनास्ठळी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालय गाठले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय इकबाल सय्यद आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. दरम्यान, या प्रकरणात माजी महापौरांचा मुलगा संशयित आरोपींमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हातमजुरी करुन हाकत होता संसाराचा गाडा

मयत जितेंद्र साळुंखे हा जळगावातील गेंदालाल मील परिसरातील रहीवासी होता. तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील जेमतेम होती. तो हातमजुरी करून पत्नी व तीन मुलांसह उदरनिर्वाह करीत होते. जितेंद्र याच्या हत्येमुळे साळुंखे कुटुंबियांवर दुःखचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे विवाहितेचा कुंकू तर चिमुकल्यांच्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपले आहे.

Editor  
Editor लेखक हे गेल्या १५ वर्षांसापून मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव असून पत्रकारीतेतील या पंधरा वर्षांच्या प्रवासात त्यांनी दै. गावकरी, दै. तरुण भारत,दै. पुण्यनगरी, झी मीडिया, टाईम्स मीडिया गृपमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. राजकारण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, क्रीडा, हायपर लोकल, शिक्षण, सामाजिक, व्यापार-उद्योग, आरोग्य, धार्मिक, मनोरंजन आदी विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. स्वातंत्र्य लेखनशैली, अभ्यासपूर्ण दर्जेदार लेखनात ते सातत्य ठेवून आहेत. Read More
For Feedback - evyaspith909@Gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon