Muktainagar News: मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी गावात दहशत निर्माण करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांनी दोन तलवारींसह तिघांना ताब्यात घेतले आहे. यात एक अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती मुक्ताईनगर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.
या बाबात माहिती आशी की, पोलिसांना गुप्त माहीती मिळाली होती की तालुक्यातील वढोदा गावी अजय लहासे, वैभव राऊत आणि ऋषिकेश ढगे (सर्व रा. वढोदा, ता. मुक्ताईनगर) हे तिघे गावात दहशत निर्माण करण्याच्या दृष्टीने स्वतःजवळ तलवारी बाळगून आहेत. त्यानुसार पथकाने कारवाई करत दोन हजार रुपये किंमतीच्या दोन तलवारींसह तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल देवरे यांनी फिर्याद दिल्याने अजय लहासे, वैभव राऊत आणि ऋषिकेश ढगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस नाईक संदिप वानखेडे करीत आहे.
तिघांनी डॉक्टरास केली होती मारहान
दरम्यान, वरील तिघं संशयित आरोपिंनी गेल्या महिन्यात जळगाव जामोद येथील रहीवासी डॉक्टर किशोर गोपाल घाटे यांना काही एक कारण नसताना वढोदा शिवारातील मच्छिद्रनाथा महाराज कमानीजवळ मारहान करत जखमी केले. या प्रकरणी डॉ. किशोर घाटे यांनी फिर्याद दिल्याने मारहान करणारे ऋषीकेश ढगे, अजय लहासे, वैभव राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आत तलवार प्रकरणात देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



