Muktainagar crime News: बाप-लेकाच्या नात्याला काळीमा! शेतीच्या वाटणी वरून वाद, मुलाकडून वडिलांचा खून

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

Muktainagar News: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील अंतुर्ली येथील हा प्रकार असून शेतीच्या वाटणीवरून वाद होत मुलानेच जन्मदात्या पित्याचा लाथाबुक्क्यांनी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण करत खून केला आहे. शनिवारी रात्री मारहाणीची घटना घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पित्याचा आज म्हणजेच रविवार, 2 ऑक्टोबर 2025 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे अंतुर्ली परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहीती अशी की, जगदीश दामू तायडे (वय 73) असे मयत शेतकऱ्याचे नाव होते. या खून प्रकरणी मयताचे पुतणे रवींद्र रमेश तायडे (वय २७, रा. इंदिरानगर, फुकटपुरा, अंतुर्ली) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, रवींद्र यांचे चुलते जगदीश दामू तायडे यांना त्यांचा मुलगा गणेश तायडे याने मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. गणेश तायडे हा नियमितपणे दारू पिऊन घरी येत असे आणि त्याची आई व मोठ्या भावाशी भांडण करत असे.

दरम्यान, तायडे कुटुंबाची अंदाजे तीन एकर जमीन रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथे आहे, जी त्यांचे चुलते मधुकर तायडे कसतात. या जमीनीच्या वाटनीवरुन गणेश वारंवार वडील जगदीश तायडे यांच्याशी वाद घालत होता.

नेहमी प्रमाणे 1 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास गणेश याने वाद घातला. कामावरून घरी आलेल्या गणेशने त्याच्या आईशी भांडण केले. त्यानंतर, जेवण करुन तो शेळ्या ठेवण्याच्या गोठ्यात गेला आणि रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गणेश पुन्हा गोठ्यातून घराकडे येत असताना त्याने चुलत भाऊ रवींद्र तायडे यांना मी बापाला मारले आहे आणि त्यांना विहिरीत टाकून देणार असे सांगितले.

त्यानंतर रवींद्र तायडे यांनी तात्काळ आपल्या मित्रांना सोबत घेऊन गोठ्यात धाव घेतली. तिथे जगदीश तायडे यांचा चेहरा रक्ताने माखलेला होता, तसेच त्यांचा डावा हात कोपरातून मोडलेला दिसत होता. त्यानंतर, जखमी जगदीश तायडे यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना रविवारी, 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजता त्यांचा मृत्यू झाला. मयत जगदीश तायडे यांना शेती वाटून घेण्याच्या वादातून मुलगा गणेश तायडे याने कु्ऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने, लाथाबुक्क्यांनी आणि विटांनी मारहाण करून गंभीर जखमी करत त्यांचा खून केला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Editor  
Editor लेखक हे गेल्या १५ वर्षांसापून मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव असून पत्रकारीतेतील या पंधरा वर्षांच्या प्रवासात त्यांनी दै. गावकरी, दै. तरुण भारत,दै. पुण्यनगरी, झी मीडिया, टाईम्स मीडिया गृपमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. राजकारण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, क्रीडा, हायपर लोकल, शिक्षण, सामाजिक, व्यापार-उद्योग, आरोग्य, धार्मिक, मनोरंजन आदी विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. स्वातंत्र्य लेखनशैली, अभ्यासपूर्ण दर्जेदार लेखनात ते सातत्य ठेवून आहेत. Read More
For Feedback - evyaspith909@Gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon