Jamner News: जग 21 व्या शतकात वावरत असताना देखील हुंडा सारख्या कुप्रथा आजही समाजात सुरु आहे. अशातच हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पैशांसाठीचा सततचा तगादा सहन न झाल्याने विवाहितेने मृत्यूला कवटाळल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, सासरच्या मंडळींनी आपल्या मुलीला गळफास दिल्याचा आरोप मयत विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे.
मयत विवाहितेच्या नातेवायिकांच्या म्हणण्यानुसार, वाळूचे डंपर घेण्यासाठी माहेरवरुन 20 लाख रुपये हुंड्याच्या स्वरुपात आणावे असे म्हणत विवाहिता भाग्यश्रीचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता. पैशांसाठी होत असलेला सततचा तगादा यामुळे भाग्यश्री खूप त्रस्त झाली होती. शेवटी सासरच्यांनी तिला मारून टाकल्याचा आरोप मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. धक्कादायक असा हा प्रकार जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील जंगीपूरा येथे घडला आहे.
या प्रकरणी विवाहितेच्या वडीलांनी फिर्याद दिल्याने विवाहितेचा पती राहूल राजपूत, सासू रेखाबाई राजपूत, सासरे गोविंदसिंग राजपूत, दीर सुनिल राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक नंदकुमार शिंब्रे करीत आहे.