Uddhav Thackeray Visit Raj Thackeray Home: शिवसैनिक आणि मनसे सैनिकांना सुखद धक्का देणारा क्षण आज जुळून आला आहे. निमित्त ठरले ते गणेशोत्सवाचे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कुटुंब तब्बल 22 वर्षांनी एकत्र आले आहे. गणेश चतुर्थीनिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आमंत्रणाला मान देत उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या‘शिवतीर्थ’निवासस्थानी सहकुटुंब जात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. दोन्ही कुटूंबाची ही सहपरिवार भेट तब्बल 22 वर्षांनी झाली आहे.
या भेटीप्रसंगी मनसे आणि ठाकरे शिवसेचे प्रमुख नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे अशी अशी महाराष्ट्रातील असंख जनतेची ईच्छा आहे. आणि सुरुवात देखील झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळसाह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तीनवेळा एकत्र आले आहे. आज पुन्हा आज उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थवर जात महाराष्ट्राला सुखद धक्का दिला आहे.
बाळा नांदगांवकर आणि आदित्य ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट
राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे मनसे नेते बाळा नांदगांवकर हे देखील शिवतीर्थवर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या घरी उपस्थिती लावल्यानंतर बाळा नांदगांवकर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीसंदर्भात भावना व्यक्त केल्या आहेत. तर आदित्य ठाकरेंने देखील सोशल मीडिया पोस्ट करत या भेटीची माहिती दिली.