Jamner News: अवैध गॅस रिफिलिंग उठले जीवावर, ओमनीत गॅस भरताना जामनेरात स्फोट

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

Jamner News: घरगुती गॅसचा काळा बाजार राजेरोसपणे सुरु आहे. व्यवसायिक वापरासह अवैधरित्या वाहनांमध्ये इंधन म्हणून याचा सर्सास वापर होत आहे. हीच अवैध गॅस रिफिलिंग आता लोकांच्या जीवावर उठले आहे. याचं ताज उदाहरण सोमवार, 29 सप्टेंबर 2025 रोजी जामनेरात बघायला मिळालं. या ठिकाणी ओमनी वाहनात गॅस रिफिलिंग करतान स्फोट झाला. हा स्फोट इतका भिषण होता की परिसर हादरुन गेला. या अपघातात एक जण जखमी तसेच मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमनेर शहरात मोठ्याप्रमाणात अवैध धंदे फोफावले आहे. त्यात अवैधरित्या गॅस रिफिलिंगने कळस गाठला आहे. प्रवासी वाहतूक करणारे खासगी वाहन प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रासपणे घरगुती वापराचा गॅस वाहनांमध्ये वापरत आहे. त्यासाठी जामनेर शहरासह परिसारात अनेक ठिकाणी अवैध गॅस रिफिलिंग सेंटर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गॅस रिफिलिंग केली जाते.

अशात जामनेर शहर स्फोटाच्या घटनेने हादरले आहे. सोमवार 29 सप्टेंबर 2025 रोजी शहरातील बोदवड रोड भागात हा स्फोट झाला. बोदवड रोड भागातील एकता नगर परिसरात ओमनी गाडीत अवैधरित्या गॅस भरत असताना अचानक भिषण स्फोट झाला. एकता नगर भागात अवैध गॅस रिफिलिंग सेंटर आहे. पत्र्याच्या गोडाऊनमध्ये प्रशासनाच्या नाकावर टीच्चून हे सेंटर सुरु होते. या ठिकाणी एक ओमनी गॅस भरण्यासाठी आली असता गॅस भरताना हा भिषण आपघात झाला.

स्फोटात मोठे नुकसान

हा स्फोट इतका भिषण होता की गॅस भरण्यासाठी आलेली ओमनी व जवळच उभी असलेली मोटरसायकल तसेच गोडाऊन जळून खाक झाले. यासह एक जण गंभीर जखमी तसेच सिलेंडरच्या स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरुन गेले. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला शेख सलीम व गोडाऊन मालक यांचेवर अवैध गॅस रिफिलिंगबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरिक्षक कासार, तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी भेट दिली.

Editor  
Editor लेखक हे गेल्या १५ वर्षांसापून मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव असून पत्रकारीतेतील या पंधरा वर्षांच्या प्रवासात त्यांनी दै. गावकरी, दै. तरुण भारत,दै. पुण्यनगरी, झी मीडिया, टाईम्स मीडिया गृपमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. राजकारण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, क्रीडा, हायपर लोकल, शिक्षण, सामाजिक, व्यापार-उद्योग, आरोग्य, धार्मिक, मनोरंजन आदी विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. स्वातंत्र्य लेखनशैली, अभ्यासपूर्ण दर्जेदार लेखनात ते सातत्य ठेवून आहेत. Read More
For Feedback - evyaspith909@Gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon