Jalgaon News: जळगाव जिल्हा रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १४ सप्टेंवर २०२५ रोजी शहरातील पद्मवती मंगलकार्यालयात पार पडली. यावेळ जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा व संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. किरण सोनवणे, डॉ. विजय कुरकुरे, डॉ. सचिन आहिरे, पतसंस्थेचे चेअरमन दिलीप गायकवाड, सचिव अमित वागदे, संचालक सरफराज तडवी, डॉ. मनोज पाटील, उदय बोंडे, विनोद चौधरी, सुरेखा लष्करे, छाया पाटील, सुधीर करोसिया, मंगेश बोरसे, सविता बिऱ्हाडे, दत्तात्रय चौधरी, महेंद्र बागुल उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला पतसंस्थेचा लेखाजोखा सभासदांसमोर सादर करण्यात आला. त्यानंतर गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रम पार पडला. यात जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या २५ गुणवंत पाल्यांचा व १२ सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरफराज तडवी यांनी तर अभार प्रदर्शन सुरेखा लष्करे यांनी केले. यावेळी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.




