Remedies to Prevent Frequent Urination in marathi: व्यक्तीला जीवनात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात काहींना वारंवार लघवीची समस्या निर्माण होते. अनेकांना दिवसांतून तीन-चार वेळा किंवा त्याहून अधिक वेळा लघवी लागते. जर तुम्हाला देखील या प्रकारची समस्या उद्भवत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, वारंवार लघवीच्या समस्येमुळे व्यक्तीला आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. प्रवासादरम्यान ही समस्या अधिक गंभीर ठरते. वारंवार लघवी लागण्याच्या समस्येमुळे वृद्धत्व, मधुमेह, मूत्रमार्गाचा संसर्ग, प्रोस्टेटशी संबंधित समस्यांमुळे होऊ शकते. त्यामुळे या समस्येवर वेळीच उपाय केला पाहीजे. चला तर मग जाणून घेऊया वारंवार लघवी लागण्याच्या समस्येवर काही घरगुती उपाय.
करा हे घरगुती उपाय
धणे पाणी प्या – वारंवार लघवी लागण्याची समस्या अनेकांना निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी धणे पाणी पिणे हा चांगला उपाय मानला जातो. त्यामुळे तुम्हाल वारंवार लघवी लागण्याची समस्या असेल तर धणे पाणी प्या. यासाठी रात्रभर धणे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी खाली पोट ते गाळून प्या.
शतावरी – आयुर्वेदानुसार, वारंवार लघवी लागण्याच्या समस्येवर शतावरी सेवन प्रभावी ठरते. असे केल्याने मुत्रपिंड मजबूत होते. वारंवार लघवीची समस्या दूर करण्यासाठी शतावीरीचे सेवन दुधासोबत केले पाहीजे. असे केल्याने वारंवार लघवी होण्याची समस्या दूर होऊ शकते.
अश्वगंधा – आयुर्वेदात अश्वगंधाचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले आहे. त्यानुसार, वारंवार लघवीच्या समस्येवर देखील अश्वगंधा प्रभावी ठरते. आयुर्वेदानुसार, अश्वगंधा मज्जासंस्था शांत करण्यास मदत करते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात एक चमचा अश्वगंधा पावडर मिसळून त्याचे सेवन करावे. यामुळे वारंवार लघवीची समस्या दूर होते.
मध-आवळा – व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. मूत्रमार्ग निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. तुम्हाल वारंवार लघवीची समस्या असेल तर तुम्ही आवळ्याच्या पावडरमध्ये मध मिसळून सेवन करू शकता. असे केल्याने लाभ होतो.
(टीपः या लेखात दिलेला मजकूर, उपाय वाचकांना माहिती म्हणून देत आहोत. evyaspith.com याची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)