Ganesh Festival 2025 : मोरया गणेश मंडळात रंगली दांडीयाची रास

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

Ganesh Festival 2025 : शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्त मोरया गणेश मंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि. 31 ऑगस्ट रोजी दांडीयाची रास रंगली. यावेळी परिसरातील महिलांनी दांडीयात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

गणपती नगर, पिंप्राळा येथील मोरया गणेश मंडळात गणेश चतुर्थीनिमित्त दि. 27 रोजी मंडळाचे कार्यकर्ते भुषण भालेराव यांनी सपत्नीक गणपतीची स्थापना केली. गणेशोत्सवानिमित्त मंडळात विविध धार्मिक कार्यक्रासह सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहे. त्यातच दि. 31 ऑगस्ट रोजी दांडीया रास रंगली. यात परिसरातील महिलांनी व तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित गणेशोत्सवात दांडीयाचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल सोनवणे, शिवम पाटील, सचिन भालेराव, भुषण भालेराव, अनुराग महाजन, मोहीत बारी, नागराज पाटील, विकास चव्हण, भावेश माळी, अक्षय भालेराव, तेजस पाटील, अक्षय महाजन, ऋषीकेष बारी, रोहीत मडगे, ईशान रुल्हे आदींनी परिश्रम घेतले.

Editor  
Editor लेखक हे गेल्या १५ वर्षांसापून मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव असून पत्रकारीतेतील या पंधरा वर्षांच्या प्रवासात त्यांनी दै. गावकरी, दै. तरुण भारत,दै. पुण्यनगरी, झी मीडिया, टाईम्स मीडिया गृपमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. राजकारण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, क्रीडा, हायपर लोकल, शिक्षण, सामाजिक, व्यापार-उद्योग, आरोग्य, धार्मिक, मनोरंजन आदी विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. स्वातंत्र्य लेखनशैली, अभ्यासपूर्ण दर्जेदार लेखनात ते सातत्य ठेवून आहेत. Read More
For Feedback - evyaspith909@Gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon