Ganesh Chaturthi 2025 Puja Sahitya List: हिंदू धर्मात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, गणपती हे हिंदू धर्मातील प्रथम पूजनिय दैवत आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते. गणेश पूजनाशिवाय कोणतेचा शुभकार्य सिद्ध होत नाही असे मानले जाते. गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हटले जाते. त्यांच्या आशीर्वादाने कामातील अडथळे दूर होत यशाची शक्यता अनेक पटींनी वाढते. गणपतीला भाद्रपद महिना समर्पित आहे. या महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला ‘गणेश चतुर्थी’ साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता. त्यानिमित्ताने सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवात पूजेचे फळ मिळविण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यात गणेश स्थापनेवेळी पूजेत कोणत्या साहित्यांचा समावेश असला पाहिजे जाणून घेऊया.
गणेशोत्सव हा आनंद आणि उत्साहाचा सण आहे. या काळात देशातच नव्हेत जगभरात गणेश भक्तांकडून गणपतीची स्थापना केली जाते. या दिवशी भक्त त्यांच्या घरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि सार्वजिनिक मंडळामध्ये गणपतीची स्थापना करुन बाप्पाची पूजा करतात. दहा दिवस हा उत्सव साजरा होत अनंत चतुर्थीला गणपतीचे विसर्जन केले जाते. या काळात पूजेसह भजन, कीर्तन आणि भक्तीगीते गाऊन बाप्पाची आराधना केली जाते. त्यानुसार, यंदा 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त गणेश पूजेपासून ते प्रतिष्ठापनेपर्यंतचे काय काय साहित्य अवश्यक आहे ते जाणून घेऊया.
गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, यंदा भाद्रपद महिन्याची चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 54 वाजता प्रारंभ होईल. तर 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 44 मिनिटांनी समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे. त्यानुसार, गणेश चतुर्थीचा उत्सव 27 ऑगस्ट रोजी साजरा होईल. विशेष म्हणजे या दिवशी बुधवार असून हा वार गणेशाच्या पूजेसाठी समर्पित आहे. त्यानुसार, गणेशजीच्या स्थापनेचा मुहूर्त सकाळी 11 वाजून 05 मिनिटांनी सुरु होत दुपारी 01 वाजून 40 मिनिटांनी समाप्त होईल. या शुभ वेळेत गणेश स्थापना करणे खूप शुभ आहे.
अशी आहे गणेश पूजा साहित्य यादी
गणेश मूर्ती
कलश
मोदक
हंगामी फळे
धूप
दिवा
गंगाजल
कापूर
जाणवं
सिंदूर
केळी
आरती पुस्तक
सुपारी
लाकडी चौरंग
केळीचे खांब
पिवळे आणि लाल रंगाचे कापड
नवीन कपडे
दुर्वा
नारळ
सुपारी
लाल चंदन
पंचमेवा
चंदन
फुले
अखंड तांदूळ
सुपारी
प्रसादासाठी मिठाई
(टीपः या लेखात दिलेली माहिती ही धार्मिक आणि सामाजिक मान्यतेवर आधारीत आहे. माहिती म्हणून हा लेख वाचकांना देत आहोत. evyaspith.com याची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)