Faisal Khan Accuses Brother Amir Khan: बॉलिवूडचा प्रत्येक कालाकार हा कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. त्यात मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या अभिनेता अमिर खानची बातच निराळी आहे. आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये ‘मेला’ या ब्लॉकबस्टर सिनेमातून अमिर खानने आपल्या अभिनयाची वेगळी छाप चाहत्यांच्या मनावर सोडली आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत त्याचा सख्खा भाऊ अभिनेता फैसल खान देखील होता. सध्या फैसल खान चर्चेत आहे. कारण त्याने त्याचा भाऊ मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, आमिर खानचं एका ब्रिटीश पत्रकारासोबत अफेअर होतं आणि ऐढेच नाही तर तिच्यापासून त्याला मुलगा असल्याचा दावा देखील फैसल खान याने केला आहे. फैसल खानच्या या दाव्यामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेला उधान आले आहे.
अभिनेता फैसल खान आणि अमिर खान यांच्यात सध्या कौटुंबिक वाद सुरु आहे. या वादाच्या पार्श्वभूमिवर फैसल खानने एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने हे खळबळजनक आरोप केरत तो म्हणाला की, सध्या तो त्याचा भाऊ, आमिर खान आणि त्याच्या कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडतोय. हे जाहीर करत असताना त्याने एक मोठे खळबळजनक वक्तव्य देखील केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, आमिर खानचं रिना दत्त आणि किरण राव यांच्याव्यतिरिक्त एक ब्रिटीश पत्रकार जेसिका हाइन्ससोबत अफेअर होतं. हे नातं इतकं पूढे गेलं की, जेसिकापासून त्याला एक मूलही आहे.
अशी झाली अमिर आणि जेसिकाची भेट
फैसल खानच्या या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. मिडीया रिपोर्टनुसार, अमिर खान आणि जेसिका यांची पहिली भेट फिल्म ‘गुलाम’च्या शुटिंगदरम्यान झाली. त्यानंतर, 2005 मध्ये ‘स्टारडस्ट’ मॅग्झिनमध्ये आमिर खान आणि जेसिका यांच्याबद्दल आर्टिकल देखील छापून आलं होतो. यात दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं होत. तसेच देघांना एक मूलही आहे, ज्याचं नाव जान आहे, असं देखील त्या आर्टिकलमध्ये म्हटलं होतं.
जेसिकाने केलं नाही अबॉर्शन
सुपरस्टार अमिर खान आणि जेसिका यांच्यावर नवभारत टाईम्सने देखील मोठा दावा केला आहे. स्टारडस्ट मॅग्झिनमधील लेखाचा संदर्भ घेत त्यांनी म्हटले आहे की, अमिर खान आणि जेसिका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना जेसिक प्रेग्नंट राहीली. ही बाब जेव्हा अमिरला समजली तेव्हा त्याने त्या बाळाची जबाबदारी स्विकारण्यास नकार देत जेसिकाल अबॅर्शन करण्याचा सल्ला दिला. पण जेसिकाने मुलाला जन्म देण्याचा निर्णया घेत सिंगल मदर म्हणून राहू लागली. 2000 साली तीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर, तिने लंडनमधील बिझनेसमन विल्यम टॅलबोटशी 2007 मध्ये विवाह केला.