Facilities of Vice President: देशात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत इंडिया अलायन्सचे बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करत सी.पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले आहेत. या विजयामुळे उपराष्ट्रपती पदासह त्यांना अनेक सुविधाही मिळणार आहे. देशाच्या उपराष्ट्रपतींना नियमित पगार मिळत नसला तरी त्यांना राज्यसभेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पगार मिळतो. त्यानुसार, जाणून घेऊया उपराष्ट्रपती यांना काय काय सुविधा मिळतात.
देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन यांनी इंडिया अलायन्सचे बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. त्यांनी 452 मते मिळविली. तर विरोधी उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली. सी.पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाचे वर्णन राष्ट्रवादी विचारसरणीचा विजय म्हणून केले.
भारतात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे महत्त्वाची पदे आहे. त्यातचा आता उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी आता सी.पी. राधाकृष्णन सांभाळणार आहे. या पदासोबत त्यांना काही विशेष सुविधा देखील मिळणार आहे. यात उपराष्ट्रपती म्हणून त्यांना वेतन मिळणार नसलं तरी ज्यसभेचे अध्यक्षांना म्हणून त्यांना दरमहा 4 लाख रुपये पगार मिळेल. यासोबतच एक आलिशान बंगला, एक सरकारी बुलेटप्रूफ गाडी आणि विशेष म्हणजे झेड प्लस सुरक्षा मिळेल. यासोबतच देशात आणि परदेशातील प्रवासाचा खर्च सरकार करेल. यासोबतच त्यांना दैनिक भत्ता मिळेल आणि वैद्यकीय सुविधाही सरकारी खर्चाने उपलब्ध असतील.
सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळेल का?
पदावर असताना सुविधा तर मिळतात पण, पदावरुन निवृत्त झाल्यावर काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तर उपराष्ट्रपतींना पेन्शन मिळते का? तर उपराष्ट्रपतींना पेन्शन मिळत नाही. पण, पद सोडल्यानंतर पेन्शन मिळते, परंतु ती पेन्शन राज्यसभेचे माजी अध्यक्ष म्हणून मिळते. पेन्शन हे पगाराच्या जवळजवळ अर्धे असते. म्हणजेच त्यांना पेन्शन म्हणून 2 लाख रुपये मिळू शकतात. यासह वैद्यकीय सुविधांसह अनेक सरकारी सुविधा देखील मिळतात.