Cooperative Society Elections : सहकार क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात ही अपडेट आहे. त्यानुसार, सहकार विभागाने निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. या निवडणुका येत्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता सहकार विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्यात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाने राज्यातील विविध भागाला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अक्षरशः झोडपले आहे. त्यामुळे नदीनाले दुथडी भरुन वाहत असून काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार अशा या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान, अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच वीजपुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे पूर परिस्थिती लक्षात घेता सहकार विभागाने हा निर्णय घेत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहे.
राज्य सरकारने जारी केले निवेदन
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, राज्य सरकारने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानाच्या मध्यमातून एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत सुरु असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेता पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर स्थितीच्या पुर्वी काही सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु होती आणि चिन्ह वाटपाचा टप्पा देखील आशा संस्था, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिली पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया प्रलंबित असलेल्या संस्था, तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्या संस्थेची निवडणूक घेण्याबाबत आदेश दिले आहेत अशा संस्था वगळून ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. ही निवडणूक 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत घेता येणार नाही, असे निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.