Central Railway Bharti 2025: खूशखबर! मध्य रेल्वेच्या भुसावळसह ‘या’ विभागात नोकरीची सुवर्णसंधी, 2418 जागांसाठी मेगाभरती

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

Central Railway Apprentice Recruitment 2025 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेतर्फे शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) पदांसाठी भरती प्रक्रीया राबविली जात आहे. या भरती प्रक्रीयेंतर्गत एकूण 2418 रिक्त पदे भरली जाणार आहे. मध्य रेल्वेने अप्रेंटिस कायदा 1961 अंतर्गत शिकाऊ उमेदवार भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांन येत्या11 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांना सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रीयेंतर्गत मध्य रेल्वे एकूण 2418 जागा भरणार आहे. या जागा भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर क्लस्टरमध्ये भरल्या जातील. यामुळे उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

अशी आहे शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवार 10वी पास आणि ITI उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे. प्रक्रियेमध्ये निवड दहावीच्या (किमान 50% गुणांसह) आणि ITI गुणांच्या आधारावर होईल. ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे वयोमर्यादेत तर एससी/एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 7000 रुपये स्टायपेंड वेतन मिळेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

मध्य रेल्वेच्या एकूण 2418 शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रीसाठी 12 ऑगस्ट 2025 पासून अर्ज प्रक्रीया सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2025 आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रीयेंतर्गत राखीव वर्गासाठी कोणतेही शुल्क नाही. तर सामान्य वर्गासाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे.

evyaspith909@Gmail.com  के बारे में
For Feedback - evyaspith909@Gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon