Bhandara Guardian Minister: भाजपाकडून संजय सावकारेंची पालकमंत्रीपदावरुन उचलबांगडी, भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री पंकज भोयर

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

Bhandara Guardian Minister: पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळण्यास अकार्यक्षम ठरल्याने राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्यावर नामुस्कीची वेळ आली आहे. महायुती सरकारने ना. सावकारे यांच्याबाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सरकारने अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलला आहे. त्यामुळे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे मावळते पालकमंत्री ठरले आहे. ना. संजय सावकारे यांची सोमवारी रात्री अचानक उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यानुसार, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचा शासन आदेश जारी होत नवे पालकमंत्री म्हणून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

राज्यात सध्या संजय सावकारे याची झालेली उचलबांगडी चांगलीच चर्चेत आहे. या निर्णयानुसार, महायुती सरकारने एक प्रकारे संजय सावकारे यांचे एकप्रकारे डिमोशन केल्याचे बोतले जात आहे. आता ना. सावकारे त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी राहणार आहे.

ना. संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र त्यांच्याबाबात परिसरात तिव्र नाराजी होती. संजय सावकारे यांनी पालकमंत्री पदाला न्याय दिला नाही अशी भावना परिसारात आहे. कारण ते भंडाऱ्याचे पालकमंत्री असले तरी ते फक्त जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठक , 15 ऑगस्ट, 26 जानेवारी याव्यतिरिक्त जिल्ह्यात फारसे फिरकतही नव्हते. पालकमंत्री पदासारखी मोठी जबाबदारी असताना देखील ते या भागात पूर्ण वेळ देत नसल्याने नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या. समस्या सुटत नसल्याने तसेच भंडाऱ्यातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता. त्यामुळे सावकारेंना पालकमंत्री पदावरुन हटविण्यासाठी तसेच स्थनिक पालकमंत्री हवा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. तसेच सावकारे हे भंडाऱ्याला वेळ देण्यात ते कमी पडले आणि यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जिल्ह्यात हळूहळू ताकद वाढायला लागली होती. या सर्वबाबी लक्षात घेता महायुती सरकारने ना. सावकारे यांची उचलबांगडी केल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री बदलाबाबत सोमवारी रात्री राज्याचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी शासन आदेश जारी केला. संजय सावकारे यांची उचलबांगडी करुन त्यांच्याजागी आता पंकज भोयर यांना भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून नेमण्यात आले.

evyaspith909@Gmail.com  के बारे में
For Feedback - evyaspith909@Gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon