Bhusawal News: धक्कादायक! ग्रामपंचायतीत सरपंचाकडून महिलेचा विनयभंग, परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

Bhusawal News: ग्रामपंचायत कार्यालयात नागरी समस्यांबाबत तक्रार घेऊन आलेल्या महिलेचा सरपंचाने ग्रामपंचायतमध्ये विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. संतापजनक असा हा प्रकार भुसावळ तालुक्यातील फुलगाव ग्रमपंचायत कार्यालयात घडला आहे. या प्रकरणी पीडीत महिलेने फिर्याद दिल्याने या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत माहिती अशी की, फुलगाव येथील रहिवाशी ३५ वर्षिय पीडीत महिला 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता गावातील समस्यांबाबत तक्रार करण्यासाठी फुलगाव ग्रामपंचायत कार्यालयात गावातील इतर महिलांना सोबत घेऊन गेली होती. याचा राग आल्याने सरपंच शाम फुलगावकर यांनी पीडीत महिलेला व सोबतच्या इतरांना मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच पीडीत महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग देखील केला. या प्रकरणी पीडीत महिलेने फिर्याद दिल्याने शाम फुलगावकर यांच्या विरुद्ध मारहाण तसेच विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश राठोड करीत आहे.

पीडीत महिलेसह 9 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

फुलगाव ग्रामपंचायत कार्यालयातील या वादानंतर परस्पराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, सरपंच शाम फुलगावकर यांनी देखील फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कचरा उचलण्याचा कारणावरुन निळकंठ चौधरी, पुष्पा चौधरी, दिनेश चौधरी, भारती चौधरी, अशिष शिंदे, हेमलता शिंदे, जगदीश कुऱ्हाडे यांची पत्नी (पुर्ण नाव माहित नाही.) व अनिता शिंदे यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत कार्यालयात गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगावातून मोटारसायकल चोरी, गुन्हा दाखल

तर दुसऱ्या घटनेत वरणगावातील धानोरी शिवारातून मोटारसायकल चोरीस गेली आहे. या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील धानोरी शिवारातील रहिवाशी रमेश पावरा यांच्या मालकीची 40 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा मोटारसायकल क्रमांक एम.पी. 68 झेड. डी. 8073 घरासमोरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. या प्रकरणी रमेश पावरा यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन डांबरे करीत आहे.

Editor  
Editor लेखक हे गेल्या १५ वर्षांसापून मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव असून पत्रकारीतेतील या पंधरा वर्षांच्या प्रवासात त्यांनी दै. गावकरी, दै. तरुण भारत,दै. पुण्यनगरी, झी मीडिया, टाईम्स मीडिया गृपमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. राजकारण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, क्रीडा, हायपर लोकल, शिक्षण, सामाजिक, व्यापार-उद्योग, आरोग्य, धार्मिक, मनोरंजन आदी विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. स्वातंत्र्य लेखनशैली, अभ्यासपूर्ण दर्जेदार लेखनात ते सातत्य ठेवून आहेत. Read More
For Feedback - evyaspith909@Gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon