Bhusawal Crime: भुसावळ पुन्हा हादरलं! कौटुंबिक वादातून जावयाने केली सासऱ्याची हत्या

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

Bhusawal Crime News : गुन्हेगारीमुळे कायम चर्चेत राहणारे भुसावळ शहर पुन्हा खुनाच्या घटनेने हादरले आहे. शहरातील आयान कॉलनीतून खुनाची घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून हा खून झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत कौटुंबिक वादातून जावायाने आपल्या सासरा आणि मामे सासऱ्यावर चाकून हल्ला केला. यात मामे सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक असा हा प्रकार शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जावयास अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील आयान कॉलनी भागात सुभान शेख राहतो. त्याचे गेल्या चार वर्षांपूर्वी कंडारी येथील येथील मुलीशी निकाह झाला आहे. दोघं पती-पत्नी भुसावळ शहरातील आयान कॉलनी भागात राहतात. दरम्यान, पती सुभान शेख आणि त्यांची पत्नी यांच्यामध्ये कायम कौटुंबिक वाद होत असतो. अशात शुक्रवारी दुपारी पुन्हा दोन्ही पती-पत्नी यांच्यात वाद झाला. या वादानंतर सुभान शेख यांची पत्नी रागात जळगाव येथे तिच्या मामाकडे निघून गेली.

जवायाला समजविण्यासाठी आले आन्

दरम्यान, आपली भाची भांडण करुन आल्याचे लक्षात घेत मामा समद शेख इस्माईल कुरेशी यांनी जावायाच्या घरी जावून त्याला समजविण्याच्या दृष्टीने भुसावळ जाण्याचे ठरविले. सोबत भाचीच्या वडिलांना देखील बोलवून घेतले. त्यानुसार विवाहितेचे वडील व मामा हे जावाईच्या घरी समजूत काढण्यासाठी पोहचले असता जावाई सुभान याने त्याचा मामे सासरा समद शेख इस्माईल कुरेशी यांच्यावर चाकूने हल्ला केला. येवढेच नाही तर त्याने त्याचे सासरे शेख जमिल शेख शकुर यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला. यात समद शेख इस्माईल कुरेशी यांचा मृत्यू झाला आहे. तर सासरे शेख जमिल शेख शकुर हे गंभीर जखमी झाले आहे. माम सासरे समद शेख इस्माईल यांना चाकूने छातीवर वार केल्याने उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जावई पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षण राजू सांगळे, पोउप निरी. मंगेश जाधव तसेच गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांची घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मारेकरी सुभान शेख यास ताब्यात घेतले.

पती-पत्नीमध्ये नेहमी वाद

मारेकरी सुभान शेख याचा चार वर्षांपूर्वी निकाह झाला होता. त्याची सासरवाडी ही भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील आहे. लग्नाच्या सुरुवातीचे काही दिवस दोघं पती-पत्नीचा संसार सुखाने सुरु होता. मात्र, कालांतराने त्यांच्या नात्यात वादाची ठिणगी पडली अन् दोघ पती-पत्नीमध्ये नेहमी कौटुंबिक वाद होऊ लागले. वाद झाले की, पत्नी माहेरी निघून जायची व परत यायची. त्यानुसार, शुक्रवार, 12 रोजी दुपारी देखील दोघे पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाला आणि ती जळगाव येथे मामाकडे गेली होती. त्यानंतर जावायाची समजूत काढण्यासाठी विवाहितेचे मामा व वडील हे भुसावळला आले होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी जखमी शेख जमिल शेख शकुर यांची रुग्णालयात भेट घेवून घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

Editor  
Editor लेखक हे गेल्या १५ वर्षांसापून मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव असून पत्रकारीतेतील या पंधरा वर्षांच्या प्रवासात त्यांनी दै. गावकरी, दै. तरुण भारत,दै. पुण्यनगरी, झी मीडिया, टाईम्स मीडिया गृपमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. राजकारण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, क्रीडा, हायपर लोकल, शिक्षण, सामाजिक, व्यापार-उद्योग, आरोग्य, धार्मिक, मनोरंजन आदी विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. स्वातंत्र्य लेखनशैली, अभ्यासपूर्ण दर्जेदार लेखनात ते सातत्य ठेवून आहेत. Read More
For Feedback - evyaspith909@Gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon