Bhusawal Crime News: रेल्वेचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोकोवर काढले आहे. अशात शहरात गांजाची तस्करी समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव आणि भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही तस्करी उघड केली आहे. पथकाने कारवाई करत 2 लाखाच्या गांजासह एकाल अटक केली आहे. तस्कार हा मोटारसायकलवरुन गांजाची तस्करी करत होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाळ गव्हाळे यांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, एक इसम काळ्या रंगाच्या होंडा शाईन मोटारसायकलवरून अवैधरित्या गांजाची वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारावर पो.उप. निरीक्षक शरद बागल, रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे, संदिप चव्हाण, पो.कॉ. प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, महेश सोमवंशी, उमाकांत पाटील, पो.ना. विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत पाटील, पो.ना. विकास सातदिवे तसेच सहा. पो. निरीक्षक नितीन पाटील, पो.कॉ. हर्षल महाजन, परेश बिऱ्हाडे यांच्या पथकाने 22 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 1 वाजून 55 मिनिटांनी वाजता सापळा रचत भुसावळ शहरातील महामार्गावरील हॉटेल सुरुची इनसमोर संशयित काळ्या रंगाच्या सीबी शाईन मोटारसायकलला थांबविण्याचा प्रयत्न केला असता संशयित इसम मोटारसायकलसह पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.
मात्र पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो गांजाची तस्करी करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याची ओळख अनारसिंग वालसिंग भिलाला (वय 30, रा. शमलकोट, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) अशी झाली.
तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सीबी शाईन मोटारसायकल, मोबाईल तसेच 10 कोलो गांजा असा जवळपास एकूण 2 लाख 90 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये पो.कॉ. विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.