Bhusawal Crime News: भुसावळात गुन्हेगारीने चांगलेच डोकेवर काढले आहे. दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनेत वाढ होत आहे. अशात दारूच्या क्वार्टरचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दोन मद्यपींनी दारु विक्रेत्याला मारहान केल्याची घटना भुसावळ शहारात घडली आहे. या प्रकरणी दारु विक्रेत्याच्या फिर्यादीवरुन दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील मानसिंग कॉम्प्लेक्समध्ये मधुर वाईन आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या दारुच्या दुकानात दोन मद्यपी दारु घेण्यासाठी आले होते. दरम्यान, दारु विक्रेत्याने त्यांना दारुच्या क्वार्टरचे पैसे मागितले असता त्या मद्यपी दोन तरुणींनी ‘तू हमको पहचानता नहीं क्या?’ असे म्हणत पैसे देण्यास नकार देत गोंधळ घातला. दरम्यान, त्या दोघांनी काउंटरवर ठेवलेली 2 हजार 200 रुपयांची रोकड जबरीने हिसकविले. तसेच दोघांनी दुकानात काम करणारे कामगार आणि मालक पंकज जंगले यांनी धक्काबुक्की केली. यात पंकज जंगले यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी मधुर वाईनचे मालक पंकज घनश्याम जंगले यांनी फिर्याद दिल्याने बापारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी तपासचक्रे फिरवित सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोघ संशयितांची ओळख पटत यातील एकाचे नाव रितीक निदाणे तर दुसऱ्याचे नाव मिहिर तायडे निष्पन्न झाले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.
वराडसीममध्ये 35 वर्षीय महिलेचा विनयभंग, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
तर दुसऱ्या घटनेत भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे एका 35 वर्षिय महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षिय पिडीत महिला ही वराडसीम बस स्टॅंडवर असतांना पिंटू ठाकूर, प्रकाश ठाकूर व काशीनाथ पाटील या तिघांनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले. या प्रकरणी पिडीत महिलेने तालुका पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिल्याने पिंटू ठाकूर, प्रकाश ठाकूर व काशीनाथ पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विकास बाविस्कर करीत आहे.




