Bhusawal Crime: भुसावळात घरफोडी, 5 लाख 32 हजाराचा ऐवज लंपास, गुन्हा दाखल

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

Bhusawal Crime News: भुसावळ शहरात गुन्हेगारी तसेच चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. अशात शहरातील चमेली नगर भागात घरफोडी करत 5 लाख 32 हजाराचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बाजारपेठ पोलिस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील चमेली नगर भागातील काशी विश्वेश्वर मंदीराजवळ सचिन चौधरी हे राहत असून त्यांच्या घरात दि. 3 ते 4 ऑक्टोबरच्या रात्री दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरफोडी केली. सचिन अनिल चौधरी हे परिवारासह शहरातील साने गुरुजी चौकात देवी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी घराला कुलूप लावून गेले होते. आणि हीच संधी साधत चोरट्याने हात साफ केला. सचिन चौधरी हे मिरवणूक पाहून घरी परतले असता घराचे पोर्च जवळ काचा फुटलेल्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील दोघे लोखंडी कपात उघडे आणि त्यातील सामान अस्ताव्यस्त दिसले. यात चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 5 लाख 32 हजाराचा ऐवज चोरुन नेला.

इतका ऐवज लंपास

चोरट्याने घरफोडी करत कपाटातील 12 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले, 5 हजार रुपये कींमतीचे ब्रासलट, 16 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, 12 हजार रुपये किंमतीची गळ्यातील सोनसाखळी, 8 हजार रुपयांचे सोन्याचे कानातील, चांदीचे पैंजन असा एकूण 5 लाख 32 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेले. घडलेल्या प्रकाराबाबत सचिन चौधरी यांनी पोलिसांना माहिती दिली असता बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने पाहणी करता पंचनामा केला. त्यानंतर सचिन अनिल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सउपनिरी मंगेश जाधव करीत आहे.

Editor  
Editor लेखक हे गेल्या १५ वर्षांसापून मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव असून पत्रकारीतेतील या पंधरा वर्षांच्या प्रवासात त्यांनी दै. गावकरी, दै. तरुण भारत,दै. पुण्यनगरी, झी मीडिया, टाईम्स मीडिया गृपमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. राजकारण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, क्रीडा, हायपर लोकल, शिक्षण, सामाजिक, व्यापार-उद्योग, आरोग्य, धार्मिक, मनोरंजन आदी विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. स्वातंत्र्य लेखनशैली, अभ्यासपूर्ण दर्जेदार लेखनात ते सातत्य ठेवून आहेत. Read More
For Feedback - evyaspith909@Gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon