Bhusawal Crime : भुसावळात 2 गावठी पिस्टल, जिवंत काडतूसह आरोपी जाळ्यात

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

Bhusawal Crime: गुन्हेगारीच्या बाबतीत कुप्रसिद्ध असलेले भुसावळ शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने ही कारवाई करत 2 गावठी पिस्टल आणि 3 जिवंत काडतूसासह दोन जणांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी शहरात काही तरी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी वेळीच खबरदारी दाखवत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सुज्ञ नागरिकांकडून कौतूक होत आहे. तर दुसरीकडे या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

याबाबत माहीती अशी की, गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, भुसावळ उप विभागीय पोलीस अधीकारी संदीप गावित यांनी भुसावळ शहरात रेकॉर्ड वरील आरोपींच्या हालचाली वर लक्ष ठेवून त्यांचेवर प्रतीबंध करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन डी. बी. पथकाने दि. 22 ऑक्टोबर 2025 रोजी मोठी कारवाई केली. पथकातील पोहेकॉ. विजय नेरकर व पोकॉ. जावेद शहा अशांना नाईट राउंड पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली होती की, रेकॉर्डवरील आरोपी कुणाल नितीन ठाकुर (वय 19 रा. कस्तुरी नगर, भुसावळ) हा गावठी पिस्टल व जिवंत काडतूससह जामनेर रोडवरील रंगोली हॉटेलजवळ उभा आहे. कुणाल हा कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल जवळ बाळगून होता. त्यानुसार, पथकाने रंगोली हॉटेल गाठत कुणाल यास ताब्यात घेत त्याची अंग झडती घेतली असता एक लोखंडी गावठी पिस्टल मॅगझीनस व दोन जिवंत काडतूस मिळून आले.

सदरची कारवाई डी. बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, राजेश काळे, पोकॉ. जावेद शहा, पंकज तायडे व चालक सहाय्यक.फौजदार सुनिल सोनवणे, हसमत अली बशीर अली सय्यद यांच्या पथकाने केली.

वरणगावातून पिस्टल विक्रेत्यालाही घेतले ताब्यात

गावठी पिस्टल प्रकरणी कुणाल नितीन ठाकूर याच्याविरुद्ध आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कुणाल ठाकूर त्यास पोलिसी खाक्या दाखविला असता त्याने सदर गावठी पिस्टल कोणाकडून विकत घेतले याची माहिती दिली. कुणालने दिलेल्या माहितीनुसार, पथकाने वरणगाव येथून उदय राजु उजलेकर याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्यानेच कुणालला पिस्टल विकल्याचे समोर येत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच अजुन एक गावठी पिस्टल वरणगाव येथे लपवून ठेवली आहे, बाबत माहिती दिली. त्यानुसार, त्याने पथकाला 15 हजार रुपये किंमतीचे दुसरी एक लोखंडी गावठी पिस्टल मॅगझीनसह आणि 1 हजार रुपये किंमतीचे पिवळ्या धातुचा एक जिवंत काडतुस काढुन दिली.

Editor  
Editor लेखक हे गेल्या १५ वर्षांसापून मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव असून पत्रकारीतेतील या पंधरा वर्षांच्या प्रवासात त्यांनी दै. गावकरी, दै. तरुण भारत,दै. पुण्यनगरी, झी मीडिया, टाईम्स मीडिया गृपमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. राजकारण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, क्रीडा, हायपर लोकल, शिक्षण, सामाजिक, व्यापार-उद्योग, आरोग्य, धार्मिक, मनोरंजन आदी विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. स्वातंत्र्य लेखनशैली, अभ्यासपूर्ण दर्जेदार लेखनात ते सातत्य ठेवून आहेत. Read More
For Feedback - evyaspith909@Gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon