Asia Cup 2025: क्रीकेट प्रेमींना उत्सुकता लागून असलेली आशिया कप 2025 क्रीकेट स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आहे. या चषकासाठी फक्त तीन दिवस शिल्लक असून स्पर्धेचा पहिला सामना 9 सप्टेंबर 2025 रोजी आहे. आणि सर्वांच्या नजरा ज्याकडे लागून आहेत तो भारत आणि पाकिस्तानचा सामना 14 सप्टेंबर रोजी आहे. या स्पर्धेचे सर्व सामने दोन मैदानावर खेळवले जाणार आहे. त्याआधी, ज्या मैदानांवर हे सामने होणार आहे त्या ठिकाणी भारत आणि पाकिस्तानचा रेकॉर्ड तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया या दोन मैदानावर कोणत्या संघाचा काय रेकॉर्ड आहे.
‘या’ 2 मैदानावर होतील आशिया कपचे सर्व सामने
आशिया कप 2025 चे सर्व सामने 2 मैदानावर खेळवले जातील. यातील एक स्टेडियम दुबई इंटरनॅशनल स्टेडियम आहे. तर दुसरे शेख झायेद स्टेडियम. या दोन्ही मैदानावर स्पर्धेतील सर्व सामने होतील. भारत आणि पाकिस्तानचा संघ देखील याच मैदानांवर समोरासमोर येतील.
शेख झायेद स्टेडियममध्ये असा आहे भारत आणि पाकिस्तानचा रेकॉर्ड
शेख झायेद स्टेडियममध्ये टीम इंडियाने 1 टी-20 सामना खेळला आहे. हा सामना टीम इंडियाने जिंकला होता. टक्केवारीचा विचार केला तर विजयाचा टक्का 100 आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघाने या स्टेडियममध्ये 10 सामने खेळले आहेत. 10 पैकी 7 सामनन्यात पाकिस्तान विजयी झाला आहे. टक्केवारीचा विचार केला तर पाकिस्तानच्या विजयाचा टक्का 70 आहे.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये असा आहे भारत आणि पाकिस्तानचा रेकॉर्ड
आयसीसीच्या डाटानुसार, दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारताने आतापर्यंत 9 टी-20 सामने खेळले आहेत. या 9 पैकी 5 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तर 4 सामन्यात टीम इंडियाच्या पदरी पराभव आला. या अकडेवारीनुसार भारतीय संघाचा विजयाचा टक्का 55 आहे. तर पाकिस्तानने या मैदानावर 32 सामने खेळले आहेत. यातील 17 सामने पाकिस्तानने जिंकले. तर 14 सामने गमावले आहेत. टक्केवारीचा विचार केला तर पाकिस्तानचा विजयाचा टक्का 55 आहे.