Aajche Rashi Bhavishya: मेष ते मीन राशीसाठी कसा राहील शुक्रवार? वाचा राशीभविष्य

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

दैनिक राशीभविष्य, Daily Horoscope 12 September 2025: पंचांगानुसार, सध्या भाद्रपद माह सुरु आहे. त्यानुसार, शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025 रोजी भाद्रपद कृष्ण पंचमी तिथी आहे. या दिवशी भरणी नक्षत्र आणि व्याघात योग जुळून येत आहे. अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 49 मिनिटे ते 12 वाजून 38 मिनिटांपर्यंत राहील. तर सकाळी 10 वाजून 41 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 13 मिनिटांपर्यंत राहुकाळ असेल. तर चंद्र मेष राशीत भ्रमण करेल. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशींसाठी कसा राहील शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025 रोजीचा दिवस.

मेष आजचे राशीभविष्य ( Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. कारण गुरु तिसऱ्या घरात,
चंद्र दहाव्या तर शनी बाराव्या घरात आहे. ही ग्रहस्थिती नोकरीत यशाचा एक नवीन अध्याय सुरू करणारी ठरेल. व्यावसायिक प्रकल्पांमधील अडथळे दूर होतील. तुम्ही नोकरीच्या ठिकाणी प्रसंन्न असाल. लव्ह लाईफ आनंदी राहील. शक्य तितके प्रवास करणे टाळा. आरोग्य उत्तम राहील.
शुभ रंग – हिरवा आणि लाल.
शुभ अंक – 2 आणि 9.
उपाय- सुंदरकांड वाचा. तीळ आणि काळे चणे दान करा.

वृषभ आजचे राशीभविष्य (Taurus Horoscope Today)

नोकरीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कारण, आज गुरु तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात आहे. तर चंद्र नवव्या घरात आणि शनी अकराव्या घरात आहे. नोकरीतील यशामुळे तुम्ही प्रसन्न आणि उत्साही राहाल. कामावर लक्ष केंद्रित करा. तसेच रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्य सामान्य राहील. व्यवसायात एखादा विशेष प्रकल्प यशस्वी करण्यात व्यस्त राहाल. लव्ह लाईफ चांगले राहील.
शुभ रंग – पांढरा आणि निळा.
शुभ अंक – 4 आणि 8.
उपाय – दुर्गासप्तशतीचे पठण करा.

मिथुन आजचे राशीभविष्य (Gemini Horoscope Today)

 

आज गुरु आणि शनी अनुकून असून व्यवसायात अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन व्यवसायिक करार मिळू शकतात. नोकरदार वर्गासाठी देखील चांगल्या संधी मिळतील. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. लव्ह लाईफ सामान्य राहील, परंतु वाद होण्याची शक्यता देखील आहे.
शुभ रंग – निळा आणि आकाशी.
शुभ अंक – 5 आणि 9.
उपाय – हनुमान बाहुकचे पठण 7 वेळा करा. तीळ दान करा.

कर्क आजचे राशीभविष्य (Cancer Horoscope Today)

आज आयटी, व्यवस्थापन, बँकिंग क्षेत्रातील लोकांची प्रगती होऊ शकते. नवीन व्यवसाय करारात अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना भविष्यातील यशासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. लव्ह लाईफला वळण येऊ शकते. तरुणांचे प्रेम जीवन चांगले राहील.
शुभ रंग – पिवळा आणि लाल.
शुभ अंक – 3 आणि 6.
उपाय – हनुमानजींची पूजा करत हनुमान चालीसा 7 वेळा पठण करा.

सिंह आजचे राशीभविष्य (Leo Horoscope Today)

तुमच्यासाठी चंद्र, सूर्य आणि गुरु सकारात्मक आहे. धार्मिक कार्य आणि व्यवसायात यश मिळेल. विद्यार्थ्यांना यशासाठी अधीक प्रयत्न करावे लागतील. मन एकाग्र करण्यासाठी योग आणि ध्यान करा. विद्यार्थ्यांनी उर्जेचा योग्य वापर करावा. लव्ह लाईफ सामान्य राहील.
शुभ रंग – केशरी आणि लाल.
शुभ अंक – 8 आणि 5.
उपाय – हनुमानाची पूजा करा आणि तीळ दान करा.

कन्या आजचे राशीभविष्य (Virgo Horoscope Today)

आजचा दिवस नोकरी-व्यवसायासाठी अनुकूल आहे. व्यवसायात लाभ होईल. नोकरीत पदोन्नतीसाठी प्रयत्न करावे लागतील. तुम्ही मित भाषिक आहात तुम्ही बोलण्याने इतरांचे मन जिंकता. या गुणांनी तुम्ही कामात यशस्वी व्हाल. प्रलंबित कामे मर्गी लागतील. आरोग्याच्या उत्तम राहील.
शुभ रंग – हिरवा आणि निळा.
शुभ अंक – 4 आणि 8.
उपाय- तीळ आणि तांदूळ दान करा.

तूळ आजचे राशीभविष्य (Libra Horoscope Today)

मंगळाची कृपादृष्टी तुमच्यावर आहे. शुक्र आणि मंगळामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. लव्ह लाईफ उत्तम राहील. पार्टनर सोबत रोमँटिक सहलीला गेल्याने मन उत्साह आणि तणावापासून मुक्त राहील. व्यवसायातील यश मिळेल ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.
शुभ रंग – हिराव आणि पिवळा.
शुभ अंक – 6 आणि 5.
उपाय – श्रीहरी विष्णूला तुळशी पत्र आणि मिठाई अर्पण करा.

वृश्चिक आजचे राशीभविष्य (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनी आज यशासाठी प्रयत्न करावे लागतील. कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित नियमांचे पालन करवे. वरिष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकता. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. मानसिक शांतीसाठी एकांतात वेळ घालवाल.
शुभ रंग – हिरवा आणि निळा.
शुभ अंक – 7 आणि 3.
उपाय – महादेवाची पूजा करा आणि तीळ दान करा.

धनु आजचे राशीभविष्य (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीचे लोकांची प्रलंबित कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत दिवस खूप अनुकूल असून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. लव्ह लाईफमध्ये उत्साह आणि आनंद राहील. आरोग्य उत्तम राहील. मोठ्या भावाचे सहकार्य लाभेल.
शुभ रंग – केशरी आणि निळा.
शुभ अंक – 8 आणि 3.
उपाय – मसूर डाळ दान करा.

मकर आजचे राशीभविष्य (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी-व्यवसायात लाभ होईल. विशेषतः अन्नपदार्थांशी संबंधित व्यावसायिकांना विशेष लाभ होईल. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. तसेच, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वी होतील.
शुभ रंग – पिवळा आणि लाल.
शुभ अंक – 4 आणि 6.
उपाय – तीळ आणि उडीद दान करा.

कुंभ राशीभविष्य (Aquarius Horoscope Today)

विद्यार्थ्यासाठी आजचा दिवस सामान्य राहील. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात गुंतलेले राहील. आज इतरांच्या चुका माफ करण्याचा प्रयत्न करा. नोकरदार वर्गाला यशासाठी अधिक प्रयत्न करावे लागेल. व्यवासायात परिस्थिती संमित्र स्वरुपाची राहील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ रंग – पांढरा आणि हिरवा.
शुभ अंक – 5 आणि 9.
उपाय – तांदूळ आणि गूळाचे दान करा. श्रीहरी विष्णूची पूजा करा.

 

मीन आजचे राशी भविष्य (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस तणावाचा राहील. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. मानसिक शांतीसाठी ध्यान करा. आज तुमचे खर्च वाढू शकतात. सोबतच व्यावसायात लाभ देखील संभवतो. लव्ह लाईफ रोमँटिक राहील. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थी करिअरमध्ये यशस्वी होतील.
शुभ रंग – केशरी आणि लाल.
शुभ अंक – 1 आणि 5.
उपाय – श्री आदित्यहृदय स्तोत्राचे 3 वेळा पठण करा.

Editor  
Editor लेखक हे गेल्या १५ वर्षांसापून मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव असून पत्रकारीतेतील या पंधरा वर्षांच्या प्रवासात त्यांनी दै. गावकरी, दै. तरुण भारत,दै. पुण्यनगरी, झी मीडिया, टाईम्स मीडिया गृपमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. राजकारण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, क्रीडा, हायपर लोकल, शिक्षण, सामाजिक, व्यापार-उद्योग, आरोग्य, धार्मिक, मनोरंजन आदी विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. स्वातंत्र्य लेखनशैली, अभ्यासपूर्ण दर्जेदार लेखनात ते सातत्य ठेवून आहेत. Read More
For Feedback - evyaspith909@Gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon