Bhusawal Crime News: वरणगाव पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी फुलगाव शिवारात ही कारवाई केली असून यात गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित हे परिसरात दहशत माजवण्याच्या दृष्टीने गावठी कट्टा बाळगून परिसरात वावरत होते.
याबाबात माहिती अशी की, वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील फुलगाव शिवार महामार्ग क्रं. 53 च्या सर्व्हिस रोडच्या फुलगाव फाट्याजवळ रोडवर दि. 30 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास कविन भोसले व सुजल पवार (दोघे राहणार हलखेडा, ता. मुक्ताईनगर) परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा व जिवंत काडतूस स्वतः जवळ बाळगून होते. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली असता वरणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने फुलगाव फाटा गाठत दोघांची चौकशी केली असता दोघांजवळ 30 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा मॅगझिनसह अढळून आला. सोबत 4 हजार रुपये किंमतीचे 1 जिवंत काडतूस देखील त्यांच्याजवळ मिळून आले.
या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना गावठी कट्टा, काडतूस 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व 40 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल, काळ्या रंगाची बॅग असा एकून 79 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत कविन भोसले याला अटक केली आहे. तर सुजल पवार हा फरार झाला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर शिंदे करीत आहे.




