Bhusawal News : अप्सरा चौकात अनधिकृत हॉकर्सची डोकेदुखी! कारवाईसाठी व्यापाऱ्यांचे उपोषण

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Join Our WhatsApp Channel

Bhusawal News: भुसावळ येथील अप्सरा चौकात मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉकर्स आहे. अप्सरा चौक ते प्यारेलाल भजेवाले गल्लीपर्यंत ही समस्या गंभीर आहे. या अनधिकृत हॉकर्समुळे या भागात वाहतुकीची कोंडी कायमची झाली आहे. त्यामुळे या अनधिकृत हॉकर्स धारकांना हटविण्यात यावे, या मागणीसाठी छबिलदास चौधरी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांतर्फे दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी अप्सरा चौकात आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या 50 वर्षासापून आम्ही व्यापारी बाजारपेठेत दुकान घेऊन व्यवसाय करत आहोत. आम्ही नगरपालिकेचा कर वेळेवर भरतो तरी देखील आम्हाल अवश्यक त्या सुविधा मिळत नाही. त्यात बाजारपेठेत अनाधिकृत हॉकर्स धारकांचा मोठा त्रास वाढला आहे. दुकाना सामोर अवैध हॉकर्सधारक उभे राहत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी देखील होते. ये-जा करण्यास जागा राहत नसल्याने ग्राहकांना दुकानात येण्यास अडचण निर्माण होते. यामुळे व्यापारी आणि हॉकर्स बांधवांमध्ये नेहमी वाद विवाद होत असतो. या समस्येबाबत व्यापाऱ्यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देत हॉकर्सधारकांना एक आठवड्याच्या आत इतरत्र स्थलांतरित करावे अशी मागणी केली होती. नगरपालिका प्रशासनाच्यावतीने काहीही कारवाई न झाल्यामुळे सर्व व्यापारी उपोषणाला बसले आहे.

Editor  
Editor लेखक हे गेल्या १५ वर्षांसापून मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव असून पत्रकारीतेतील या पंधरा वर्षांच्या प्रवासात त्यांनी दै. गावकरी, दै. तरुण भारत,दै. पुण्यनगरी, झी मीडिया, टाईम्स मीडिया गृपमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. राजकारण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, क्रीडा, हायपर लोकल, शिक्षण, सामाजिक, व्यापार-उद्योग, आरोग्य, धार्मिक, मनोरंजन आदी विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. स्वातंत्र्य लेखनशैली, अभ्यासपूर्ण दर्जेदार लेखनात ते सातत्य ठेवून आहेत. Read More
For Feedback - evyaspith909@Gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon