Jalgaon Dhule Nashik Weather Update: गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. राज्यात दोन दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी लागत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा जोर दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पावसाचा हा जोर पुढील दोन-तीन कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबई पुण्यासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा- विदर्भात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. विशेषतः जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून आज आणि उद्यासाठी पावसाचा यलो अलर्ट IMD ने जारी केला आहे.
दमदार पावसाचा अलर्ट
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात बदल होत पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यानुसार, आज म्हणजे 4 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण कोकणात विविध अलर्ट देण्यात आले आहेत. मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, रायगड, ठाणे, पालघर, पुणे घाटमाथ्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावर येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यासाठी भारतील हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
जळगावात शुक्रवारी देखील मुसळधार
IMD च्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पावसाचे असून या काळात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. आज प्रमाणे उद्या म्हणजेच शुक्रवार 5 सप्टेंबर 2025 साठी देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार, जळगाव, धुळे, नाशिक, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून या भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.




